पशुपालनAgroStar
मुरघासचे जनावरांच्या आहारातील महत्व आणि फायदे!
👉🏻मुरघास खरे तर हि एक आंबवण्याची प्रक्रीया आहे .चारा साठवण्याच्या इतर काही पद्धतीमध्ये मुरघास हि एक महत्वाची पद्धत आहे , त्याच कारण अस कि पारंपारिक पद्धतीमध्ये चारा वाळऊन साठवला जातो. परंतु याद्वारे साठवलेल्या चाऱ्यातील पोषक द्रव्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. मात्र मुरघास पद्धतीने साठवलेल्या चाऱ्यातील ऱ्हास अगदी कमी प्रमाणात होतो तसेच हा चारा जनावरे अगदी चवीने खातात.
👉🏻मुरघास पासूनचे फायदे :
आपली बरीचशी चारा पिके पावसावर येणारी असतात आणि आपल्याकडे बाराही महिने हिरवा चारा मिळण्यासाठी बागायतीची कमतरता आहे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचा तुटवडा उन्हाळ्यात भासतो. म्हनून हिरव्या चाऱ्यासारखा गुणवत्ता असणारा चारा म्हणजे मुरघास असल्याने दुभत्या जनावराना उत्पादन सातत्य राखण्यासाठी तो उपयोगी ठरतो. याचे फायदे सांगायचे झाले तर याद्वारे हिरवा चारा चांगल्या अवस्थेत दीर्घकाळ टिकूऊन ठेवता येतो. गवतासारख्यानिकृष्ठ वनस्पतीपासुनही चांगल्या प्रकारे मुरघास करता येतो. जास्त प्रक्षेत्रावरील पिक कमी जागेत साठून ठेवता येते, चारा पिक लवकर कापणी होत असल्यामुळे शेत दुसऱ्या पिकाकरीता मोकळे होते.
👉🏻मुरघास तयार करण्याची पद्धती
- मुरघास तयार करताना जमिनीत खड्डा करून किंवा जमिनीवर सायलो बंकरचे बांधकाम करून घ्यावे लागते.
- सध्या प्लास्टिक बॅगचा वापर करून सुद्धा मुरघास तयार करता येतो.
- जमिनीमध्ये खड्डा करावयाचा असल्यास त्याचा आकार हा त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी आणि जनावरांची संख्या यावर अवलंबून असतो.
- खड्डा शक्यतो उंच जागेवर असला पाहिजे, म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही . - खड्ड्याच्या भिंती सिमेंटने प्लास्टर करून हवाबंद कराव्यात किवा हे शक्य नसल्यास २०० मायक्रोन प्लास्टिक पेपर खड्ड्यात अंथरावा.
- त्यानंतर चार्याचे पिक फुलोऱ्यात आल्यावर कापणी करावी आणि चार ५ ते ६ तास सुकू द्यावा, म्हणजे त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८० टक्के वरून ६० ते ६५ टक्के पर्यंत कमी होईल.
- त्यानंतर कुट्टी मशिनच्या सहायाने सुकवलेल्या चार्याची, एक इंच आकाराचे तुकडे होतील अश्या पद्धतीने कुट्टी क्कारून घ्यावी.
- त्यानंतर प्रती टन चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १ किलो युरिया ,२ किलो गुळ, १ किलो मिनरल मिक्चर , १ किलो मीठ आणि १ लिटर ताक यांचे वेगवेगळे मिश्रण तयार करून त्याचे एकत्रित १० ते १५ लिटरचे द्रावण तयार करावे .
- त्यानंतर खड्यात कुट्टी भरण्यास सुरुवात करावी. चार ते सहा इंचाचा थर देऊन झाल्यावर त्यावर तयार केलेले मिश्रण शिपडावे.
- त्यानंतर थर चोपनीने किंवा धुमसणे चोपून चांगला दाबून घ्यावा , अश्या पद्धतीने थरावरथर देऊन खड्डा भरून घ्यावा म्हणजे त्यात हवा राहणार नाही.
- खड्डा जमिनीच्या वर १ ते १.५ फुट भरून प्लास्टिक कागदाने काळजीपूर्वक झाकून घ्यावा . त्यावर वाळलेले गवत, उसाचे पाचट, गव्हाचे काड टाकून त्यावर मातीचा थर देऊन खड्डा हवाबंद करावा. मुरघास तयार होण्यास ४५ ते ६० दिवस लागतात.
👉🏻जनावरांना मुरघास देण्याचे प्रमाण :
पूर्ण वाढ झालेल्या दुभत्या जनावरास रोज १५ किलोपर्यंत मुरघास खाऊ घालावा. बैलांना ७ ते ८ किलो प्रती दिन, तसेच एक वर्षापेक्षा कमी वयाच्या वासरांना अर्धा किलो , शेळ्या मेंड्यांना दर रोज एक किलो मुरघास खाऊ घालावा.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.