क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनअॅग्रोवन
मुक्तसंचार गोठ्याचे फायदे
मुक्तसंचार गोठ्यामध्ये गाई, म्हशी मुक्तपणे फिरतात. त्यामुळे मानसिक ताणाखाली राहत नाहीत. गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी पितात. त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात. जनावरांना व्यायाम मिळतो. प्रकृती निरोगी राहते. भूक, आहारक्षमता वाढते. स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते.
• थंडीच्या वेळी गायी, म्हशी अधिक वेळ चारा खातात, अधिक वेळ बसून • विश्रांती घेतात. रवंथ करतात. त्यामुळे अन्नद्रव्यांची पाचकता वाढते. दूध उत्पादनासाठी अन्नद्रव्ये कार्यक्षमतेने वापरली जातात. वासरांची जलद वाढ होते. • मजूर व चारा व्यवस्थापनावरील खर्च कमी होतो. निर्जंतुकीकरण, साफ सफाई करण्यासाठी वेळ कमी लागतो. • गोठ्यामध्ये सोयीनुसार फेरबदल करता येतात. असे गोठे बहुउद्देशीय असतात. किरकोळ बदलासह सर्व प्रकारच्या जनावरांसाठी सर्व हंगामात उपयोगी येतात. विस्तार करण्यास सुलभ असतात. • गाई, म्हशी गोठ्यामध्ये मुक्तपणे संचार करत असल्यामुळे मानसिक ताणाखाली राहात नाहीत. गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी, क्षार मिश्रण खातात. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात. • मुक्त संचारामुळे जनावरांना व्यायाम मिळतो. प्रकृती निरोगी राहते. भूक, आहारक्षमता वाढते. पायाच्या वाढलेल्या नख्या छाटाव्या लागत नाहीत. स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते. माजावरील गाय, म्हैस चटकन ओळखता येते. • क्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक जनावरे ठराविक कालावधीकरिता सामावू शकतात. • बांधकामासाठी खर्च कमी लागतो. नुकसानीचा धोका कमी असतो. • संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, पारंपरिक बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत मुक्त गोठ्यामध्ये जोपासलेल्या कालवडींचा वाढीचा दर, वाढीच्या काळात जोपासण्याचा खर्च, दुभत्या गाई, म्हशीचे दूधउत्पादन व दुधाच्या गुणवत्तेमध्ये (स्निग्ध व अस्निग्ध पदार्थ) सुधारणा दिसून आली. मुक्त हवेशीर गोठ्यामध्ये उन्हाळी हंगामात म्हशीच्या कालवडीला प्रखर उष्णतेपासून संरक्षण मिळाल्यामुळे कालवडीचे प्रथम विताचे वय १०० दिवसांनी कमी व दुग्धोत्पादन १५० लिटरने वाढलेले दिसून आले आहे. संदर्भ –अग्रोवन २७ ऑक्टो१७
122
1
संबंधित लेख