AgroStar
मीराबाई चानूने रचला इतिहास! वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक!
कृषी वार्ताTV9 Marathi
मीराबाई चानूने रचला इतिहास! वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक!
👉 आज दुसराच दिवस असून भारताने पहिलं पदक खिशातही घातलं आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. मीराबाई चानूने ही कमाल 49 किलोग्राम महिला वर्गात केली आहे. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे. 👉 49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला. मीराबाईने रचला इतिहास 👉 मीराबाई चानूने हे रौप्य पदक पटकावत ऑलिम्पिक्स खेळात महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताला इतिहासातील दुसरं पदक मिळवून दिलं. याआधी 2000 साली सिडनी ऑलम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरी हिने पदक जिंकलं होतं. ऑलम्पिकमध्ये सिल्वर जिंकणारी मीराबाई ही बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूनंतर पहिली भारतीय महिला आहे. तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौैतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
0
इतर लेख