AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिलीबग (पिठ्या ढेकूण) किडीचे जीवन चक्र
आर्थिक महत्व:- मिलीबग पिकांच्या पिकांमध्ये कोवळ्या शेंगा, खोड व इतर भागातून रसशोषण करतात. याव्यतिरिक्त, इतर कीटकांप्रमाणेच मधासारखा रस स्त्रवतो त्यामुळे काळ्या बुरशीची वाढ होते._x000D_ जीवन चक्र_x000D_ अंडी:- मादी कीड पिकामध्ये देठाच्या किंवा पानेच्या देठाला जोडलेल्या शिरांमध्ये १०० ते २०० अंडी देतात. अंडी दिल्यानंतर मादी कीड मरते._x000D_ पिले:- ७ ते १० दिवसांत पिले अंड्यातून बाहेर पडतात. हे पाने, कोंब आणि कोवळ्या खोडांवर रसशोषण करून पिकाचे नुकसान करतात._x000D_ प्रौढ:- पिठया ढेकूणचे शरीर मेणासारख्या पदार्थाने झाकलेले असते आणि त्यांच्या शरीराच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाचा तंतु निघतो. ते सपाट, अंडाकृती किंवा गोलाकार असतात. मिलीबगचे संपूर्ण जीवन चक्र दीड ते दोन महिन्यांचे असते._x000D_ नियंत्रण:- बुप्रोफेंझीन २५% एससी @१ लिटर प्रति १००० लिटर पाण्यात किंवा मोनोक्रोटोफ़ॉस ३६% एसएल @१५०० मिली प्रति १५०० लिटर पाण्यात किंवा व्हर्टिसिलीअम लॅकेनि १.१५% डब्ल्यूपी @२.५ किलो प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_ टीप:- औषधांचे प्रमाण वेगवेगळ्या पिकांनुसार बदलते._x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
294
0