AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकात असे करा खत व्यवस्थापन !
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मिरची पिकात असे करा खत व्यवस्थापन !
➡️ लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे.मिरची पिकासाठी १००:५०:५० किलो नत्र: स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी द्यावे.लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धी नत्राची मात्रा लागवडीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी म्हणजे फलधारणेच्या वेळी द्यावी .लागवडीच्या वेळी २० ते २५ किलो फेरस सल्फेट व झिंक सल्फेट पर हेक्टर द्यावे.निंबोलीपेन्ड ८ ते १० बॅग प्रती हेक्टर द्यावे.वरील सर्व खते म्हणजे NPK, मायक्रोनुट्रीएंट व निंबोलीपेन्ड हे बेड मध्ये भरावे व मातीने झाकावे. तसेच भूमिका ४ किलो प्रति एकरी खतामध्ये मिसळून द्यावे.खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे व नंतर मिरचीचे रोप लावावे. ➡️ संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3
इतर लेख