गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील मुळकुज समस्या नियंत्रण !
🌱खरिफ हंगामात मिरची पिकामध्ये मूळकूज किंवा खोडकूज या समस्या बघायला भेटतात. अतिरिक्त पाऊस
किंवा जमिनीत सतत ओलावा राहिल्यास जमिनीलगत झाडाचे खोड ओलसर तपकिरी होऊन सडते अथवा
पिकास खोडाच्या भागापर्यंत भर दिल्यास खोडाचा मातीशी संपर्क येऊन खोडावर हानिकारक पांढऱ्या
रंगाची बुरशी वाढते. अन्नद्रव्य अपटेक चांगला न झाल्यामुळे पिकाची वाढ मंदावते. त्यापासून पीक सुरक्षित
ठेवण्यासाठी Copper Oxychloride 50% WG घटक असणारे कूपर-1 500 ग्रॅम आणि Carbendazim 50%
WP घटक असणारे धानुस्टीन 500 ग्रॅम प्रति एकर यांची एकत्रित आळवणी करावी.
🌱संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.