गुरु ज्ञानAgrostar
मिरची पिकातील भुरी रोग समस्या आणि उपायोजना!
🌱मिरची पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आढळून येतो. कोरडे वातावरण व अंशतः ढगाळ वातावरण व कमी आद्रता यामुळे भुरी रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. रोगाची लागण झाल्यावर झाडाच्या प्रामुख्याने खालच्या जुन्या पानांवर भुरकट रंगाची पिठासारखी बुरशी दिसते यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन पाने, फुले पिवळी पडून गळून जातात व झाड निस्तेज होते. यावर उपाय म्हणून पोटॅशयुक्त अन्नद्रव्याची मात्रा पिकास संतुलित प्रमाणात द्यावी. जेणेकरून पीक भुरी रोगास बळी पडणार नाही. रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ऍझोक्सिस्ट्रॉबीन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एस सी घटक असेलेले रोझताम बुरशीनाशक @ 1.25 मिली/लीटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
🌱संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.