AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील भुरी रोग समस्या आणि उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील भुरी रोग समस्या आणि उपाययोजना!
मिरची पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आढळून येतो. कोरडे वातावरण व अंशतः ढगाळ वातावरण व कमी आद्रता यामुळे भुरी रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. रोगाची लागण झाल्यावर झाडाच्या प्रामुख्याने खालच्या जुन्या पानांवर भुरकट रंगाची पिठासारखी बुरशी दिसते यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन पाने, फुले पिवळी पडून गळून जातात व झाड निस्तेज होते. यावर उपाय म्हणून पोटॅशयुक्त अन्नद्रव्याची मात्रा पिकास संतुलित प्रमाणात द्यावी. जेणेकरून पीक भुरी रोगास बळी पडणार नाही. रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मायक्लोब्यूटानिल 10 % डब्ल्यूपी घटक असेलेले बुरशीनाशक @ 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
5
इतर लेख