अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील फुलकिडी (थ्रिप्स)चे नियंत्रण!
मिरची पिकात फुलकिडी (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव झाल्यावर झाडाची पाने आकाशाच्या दिशेने होडी सारखी वळतात. तसेच फुलांची व फळांची गुणवत्ता खालावली जाते. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला मिरची पिकात थ्रिप्स कीडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकात निळे चिकट सापळे एकरी ५ ते १० लावावे व फवारणी साठी स्पिनोसॅड ४५ % एससी घटक असलेले कीटकनाशक @ ७५ मिली किंवा स्पिनेटोराम ११.७% एससी @१८० मिली किंवा थियामेथोक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @८० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
8
इतर लेख