AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील फुलकिडींचे नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील फुलकिडींचे नियंत्रण
फुलकिडींचा प्रादुर्भाव साधारणत: रोपवाटिकांमध्ये तसेच मुख्य जागी पुर्नलागवड केलेल्या पिकामध्ये होतो. पिल्ले आणि प्रौढ दोन्ही ही अवस्था पानांमधून रसशोषण करतात. परिणामी, पाने आकसून वाटीच्या आकारासारखी दिसतात, यालाच मिरचीत “लीफ कर्ल” म्हणून ओळखले जाते.
व्यवस्थापन:- • ऊन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून ऊन्हात तापू दयावी. • रोपवाटिकेत बियाणांची लागवड करण्यापूर्वी इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @ ७.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. • पुर्नलागवड करण्यापूर्वी, इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @१० मि.ली. किंवा थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये २ तासांपर्यंत रोपांची मुळे बुडवावी. • नियमित अंतरमशागत करावी. • पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव येताच, निम आधारित कीटकनाशक (१% ईसी) @ २० मिली किंवा (०.१५%) @४० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • लागवडीनंतर पंधरा दिवसांनी कार्बोफ्युरॉन ३ जी @ ३३ किलो प्रति हेक्टर जमिनीद्वारे द्यावे. • फक्त फुलकिडींसाठी, स्पिनॅटोराम ११.७ एससी @१० मिली किंवा स्पिनोसॅड ४५ एससी @३ मिली किंवा सायनट्रेनिलीप्रोल १० ओडी @३ मिली किंवा थायक्लोप्रिड २१.७ एससी @५ मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅंबडा सायहॅलोथ्रिन ९.५ झेडसी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • फुलकिडींबरोबरच, जर इतर किडींचा देखील प्रादुर्भाव असल्यास फिप्रोनिल ७% + हेक्झिथायझॉक्स २% एससी @२० मिली किंवा प्रोफेनोफॉस ४०% + फेनपायरोक्सीमेट २.५% ईसी @२० मिली किंवा स्पाइरोमेसिफेन २२.९ एससी @१० मिली किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रिन ५ ईसी @१० मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी @४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • फुलकिडी बरोबरच, मावा किडीचा प्रादुर्भाव असल्यास डायफेन्थ्यूरॉन ४७% + बायफेनथ्रिन ९.४% एससी @१० मिली किंवा स्पायरोटेट्रामेट १५.३१ ओडी @१० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @४ मिली किंवा फिप्रोनिल ५ एससी @२० मिली किंवा मिथाइल-ओ-डिमेटन २५ ईसी प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
105
1
इतर लेख