गुरु ज्ञानAgrostar
मिरची पिकातील पिवळा कोळी समस्या!
🌱पावसाळ्यात मिरची पिकात पिवळ्या कोळीचा प्रादुर्भाव होतो चुराडा मुरडा असल्यासारखी लक्षणे जरी दिसत असतील तरीही हा कोळी आहे हे लक्षात घेऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे. यामुळे झाडाची पाने खालच्या बाजूने उलट्या होडीच्या आकारासारखे होऊन पाने चुरगळून गोळा होतात. कालांतराने झाडांची तसेच फळाची
वाढ खुंटून फळांवर देखील प्रादुर्भावग्रस्त वण आढळून येतात. यावर उपयोजना म्हणून क्लोरफेनापीर 10% SC घटक असलेले इन्स्पायर कीटकनाशक @ 300 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
🌱संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.