AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील थ्रिप्सचे नियंत्रण व पिकाची जोमदार वाढ!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मिरची पिकातील थ्रिप्सचे नियंत्रण व पिकाची जोमदार वाढ!
👉 मिरची पिकात फुलकिडी (थ्रिप्स)चा प्रादुर्भाव असल्यास हि कीड पानांना खरवडून पानातील रसशोषण करते त्यामुळे झाडाची पाने आकाशाच्या दिशेने होडी सारखी वळून आकसल्यासारखी दिसतात. यामुळे पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येऊन फुलांची व फळांची गुणवत्ता खालावली जाते. 👉 यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला मिरची पिकात थ्रिप्स कीडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकात निळे चिकट सापळे एकरी ५ ते १० लावावे व फवारणीसाठी स्पिनोसॅड ४५% एससी घटक असलेले कीटकनाशक @७५ मिली किंवा स्पिनेटोराम ११.७% एससी @१८० मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @८० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. ➡️ तसेच पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर करावा. ➡️ पिकाची वाढ कमी असल्यास १९:१९:१९ बंद न करता देत राहावे. ➡️ फुलकळीचे प्रमाण वाढीसाठी १२:६१:०० ठीबकद्वारे द्यावे. दिवसआड २ किलो प्रति एकर प्रमाणे देत राहावे. फुलांची गळ होण्याची कारणे तपासून त्यानुसार पाण्याचे नियोजन करून बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
13
इतर लेख