गुरु ज्ञानAgroStar
मिरची आणि टोमॅटो पिकामध्ये चट्टे पडणे समस्या!
🌱मिरची आणि टोमॅटो पिकामध्ये चट्टे पडणे या समस्येमध्ये फळांच्या उन्हाकडील बाजूवर जास्त उन्हामुळे चट्टे पडतात नंतर तो भाग सुकून भाजल्यासारखा दिसतो. यामुळे फळांना बाजारामध्ये योग्य बाजारभाव मिळत नाही. यावर उपाययोजना म्हणून पिकास योग्य प्रमाणात पाण्याचे आणि अन्नद्रव्यांचे नियोजन करावे जेणेकरून झाडास अधिक फुटवे व दाट पानांमुळे फळे सूर्यप्रकाशापासून संरक्षित राहतील. तसेच बांधणी करताना फळे सावलीत राहतील अश्या प्रकारे बांधणी करावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.