AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मावा कीड नियंत्रणासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मावा कीड नियंत्रणासाठी उपाययोजना!
➡️ मावा या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव सध्या भुईमूग, वेलवर्गीय, संत्रावर्गीय तसेच इतर फुल, फळ आणि भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ➡️ कीड पानांमधील तसेच कोवळ्या फुटव्यामधील रस शोषण करते त्यामुळे पाने गोळा होऊन झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ➡️ तसेच किडीच्या शरीरातून मधाळ चिकट पदार्थ बाहेर पडत असल्यामुळे बुरशीची लागण तसेच मुंग्यांचा प्रादुर्भाव देखील पिकात आढळून येतो. ➡️ यावर उपाय योजना म्हणून पीक लागवडीनंतर अथवा उगणीनंतर त्वरित पिवळया चिकट सापळ्यांचा वापर करावा तसेच आंतरप्रवाही कीटकनाशकांची पिकात शक्य झाल्यास आळवणी करावी. ➡️ किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्वरित मॅड्रिड, मेंटो , अ‍ॅग्रोनील, डायमेथोएट, यासारख्या कीटकनाशकांची पीक वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2