AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मावा किडीचे जीवनचक्र
आर्थिक महत्व:- मावा किड पिकातील रस शोषण करते. हा रस शोषत असतांनाच हि किड मधासारखा गोड द्रव देखील स्रवत असते. या चिकट द्रवावर सुटी मोल्ड ही बुरशी वाढते ज्यामुळे पान काळसर दिसते. यामुळे पिकाचे साधारणतः ५०% नुकसान होते.
जीवन चक्र:- पिल्ले:- नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मादी किडींची संख्या जास्त असते. मादी कीड थेट पिल्लांना जन्म देतात. पिले ३-६ दिवसात प्रौढ होतात. प्रौढ:- उबदार आणि काहीशा उष्ण वातावरणात मावा किड पंख असलेले प्रौढ अवस्थेत जाते, तर थंड वातावरणात प्रौढ हे पंख नसलेले असतात. प्रौढ फिकट हिरव्या रंगाचे असतात. नियंत्रण:- या किडीचा अधिक प्रादुर्भाव असल्यास ऑक्सिडेमेटन - मिथाइल २५% ईसी @१ लिटर किंवा थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @५०- १०० ग्रॅम प्रति ५००-१००० लीटर पाण्यामध्ये किंवा असेटामाप्रिड १.१% + सायपरमेथ्रीन ५.५% ईसी @१७५-२०० मिली प्रति ५०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. टीप: - औषधांचे प्रमाण पीक आणि प्रादुर्भावाच्या प्रमाणानुसार बदलते. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
243
0