सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
'मावा' किडीची ओळख, जीवनचक्र, नुकसानीचा प्रकार आणि उपाय!
• बहुतेक सर्व पिकावर मावा या सूक्ष्म किडीचा प्रादुर्भाव आढळतो.
• कोवळी पाने,शेंडे यावर प्रामुख्याने दिसते.
• या किडीच्या जगभरात ४००० वर प्रजाती आहेत.
• हिरवट तपकिरी, काळी क्वचित लाल रंगाची ही कीड २ मिमि पासून १० मिमी पर्यंत असते.
• आपल्याकडे २५० पर्यंत प्रजाती आढळतात.
• यांचे प्रजनन संयोगाविना आणि संयोगातून दोन्ही प्रकारे होते.
• मादीला पंख नसतात तर नराला पंख असतात.
• पानाचा रस शोषून घेत ही कीड गोड चिकट स्त्राव सोडत असते.
• तो खाण्यासाठी मुंग्या येतात त्यावर स्वार होऊन या किडीचा प्रसार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होतो.
• मुंगळे मात्र ही कीड फस्त करतात.
• त्यामुळे ज्या शेतात मुंगळे अधिक आहेत तेथे ही कीड नियंत्रणात राहते.
• एक आठवड्यात पिलांची वाढ पूर्ण होऊन जीवनमान २/३ आठवडे असते.
• पानाच्या मागील बाजूस यांचे वास्तव्य असते.
नियंत्रण-
👉 इमिडाक्लोप्रीड, डायमेथोएट, फोस्फोमिडन, थायोमेथॉक्झामची फवारणी करतात.
👉 सेंद्रिय उपाय म्हणून गोमुत्र आणि निंबोळी अर्काची एकत्रित फवारणी केल्यास कीड नियंत्रणात राहते.
👉 कीड वेगाने वाढत असल्याने पिकाची वाढ खुंटते,पाने दुमडली जातात.
👉 भाजीपाला, कडधान्य, भरड धान्य, अन्न धान्य, तेल बिया अशा सर्व प्रकारच्या पिकावर ही कीड आढळते.
`
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.