AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
३१ मार्च पर्यंत 'या' खतांच्या किंमतीमध्ये वाढ न करण्याचा मोठा निर्णय!
कृषी वार्ताTV9 Marathi
३१ मार्च पर्यंत 'या' खतांच्या किंमतीमध्ये वाढ न करण्याचा मोठा निर्णय!
👉गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात वाढ होत असल्यानं सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना महागाईची झळ बसत आहे. शेतकऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी समोर आलीय. 👉जगातील सर्वात मोठी खत पुरवठा कंपनी इफकोनं ३१ मार्चपर्यंत खतांच्या किमती कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. इफकोनं ३१ मार्च २०२१ पर्यंत डीएपी (DAP), एनपीके (NPK) आणि एनपीएस उर्वरकाच्य किंमतीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. 👉इफकोने केलेल्या घोषणेनुसार डीएपीची किंमत १२०० रुपये, एनपीके ११७५ रुपये आणि एनपीएस ११८५ रुपये यांना एक पोते मिळेल. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी दरांमध्ये वाढ करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न 👉इफकोनं गतवर्षीच्या रब्बी हंगामात देखील खतांच्या दरांमध्ये वाढ केली नव्हती. इफकोचे एमडी यू.एस. अवस्थी यांनी ट्विटर ही माहिती दिली. 👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्याशी निगडीत असा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलांच्या किमती आणि भारतातील वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यूरियाचा वापर वाढतोय 👉भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी हरित क्रांतीनंतर (१९६५-६६) यूरीयाचा वापर सुरु करण्यात आला. १९८० मध्ये ६० लाख टन यूरिया वापरला जात होता. २०१७ मध्ये यूरियाचा वापर ३ कोटी टनापर्यंत पोहोचला. २०१८-१९ मध्ये ३२०.२० लाख टन यूरीयाची विक्री झाली. तर, २०१९-२० मध्ये ३३६.९७ लाख टन यूरिया विकला गेला. 👉पीएम नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नीम कोटेड यूरिया वापरण्याचा सल्ला दिला आहे. नीम कोटेड यूरियामुळे सामान्य यूरियापेक्षा प्रदूषण कमी होते. संदर्भ -TV9 Marathi, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
80
18
इतर लेख