AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मार्च अखेर पाच लाख टन कडधान्य वितरित करणार
कृषि वार्ताअॅग्रोवन
मार्च अखेर पाच लाख टन कडधान्य वितरित करणार
केंद्र सरकारने मार्च २०१८ अखेरपर्यंत संरक्षित साठ्यातील जास्तीत जास्त पाच लाख टन कडधान्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय पोषण आहार व त्यासारख्या इतर योजनांसाठी ही कडधान्ये देण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली. सध्या देशात एकूण १८ लाख टन कडधान्यांचा संरक्षित साठा आहे.
हा साठा कमी करण्यासाठी राज्य सरकारांना कडधान्ये दिली जात आहेत. स्वस्त धान्य दुकानांतून त्यांचे वितरण केले जात आहे. त्याच बरोबरीने शालेय पोषण आहार योजना, अंगणवाडी योजना व त्यासारख्या विविध सरकारी योजनांसाठी कडधान्य पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सुमारे साडे तीन ते पाच लाख टन कडधान्याचा साठा कमी होईल, असा अंदाज आहे. या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या मंत्रालयांना त्यांची कडधान्यांची मागणी नोंदविण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. संदर्भ –अग्रोवन२९ नोव्हे १७
11
0