AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
माती परीक्षण साठी मातीचा नमुना कसा घ्यावा
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
माती परीक्षण साठी मातीचा नमुना कसा घ्यावा
अलीकडच्या काळात शेतकऱ्याचे जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येते. सेंद्रिय खताचा अभाव आणि रासायनिक खतांचा असंतुलित वापर यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. म्हणून शेतकऱ्याने आपल्या जमिनींचे दर दोन वर्षातुन माती परीक्षण करणे गरजेचे आहे.
मातीचा नमुना कसा घ्यावा • मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणी पूर्वी ,सेंद्रिय व रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा दिल्यांनतर तीन महिन्यांनी घ्यावा.माती परिक्षणासाठी अर्धा किलो मातीची गरज असते. • माती परिक्षणासाठी शेतामध्ये नागमोडी पद्धतीने ८ ते १० ठिकाणाचा मातीचा नमुना घ्यावा. • मातीचा नमुना घेताना V आकाराचा १५ ते २० सेंमी खड्डा घेऊन खड्ड्याच्या एका बाजूची माती घ्यावी.मातीची जाडी २ ते ३ सेंमी असावी. • शेतामधुन ८ ते १० ठिकाणाहुन मातीचे नमुने घेतल्यावर त्यातील खडे,काडी,कचरा बाजूला करून माती स्वच्छ करावी. • मातीचे घेतलेले सर्व नमुने एका घमेल्यात घेऊन एकत्र करावेत व चाळणीने चाळून अर्धा किलो माती एका पिशवीत बांधून तसेच एका कागदावर शेतकऱ्याने स्वताचे नाव गाव व मातीचा नमुना घेतलेल्या शेताचा गट नंबर पिशवीला लावून माती परिक्षणासाठी द्यावी. माती परिक्षणाचा उद्देश – आपल्या जमिनीत पिक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे तपासणे व ती भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे ठरविता येते यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे.
168
0