AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 महिलांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय?
योजना व अनुदानAgroStar
महिलांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय?
👉🏻काही महिलांना भांडवलाअभावी त्यांचा व्यवसाय मोठा करता येत नाही. पण सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करु शकता.सरकारच्या या योजनांमध्ये कमी व्याजदरात कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो आणि कर्जाची परतफेडही अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी व्याजदरात करता येते. 1. मुद्रा लोन: महिला ब्युटी पार्लर, ट्यूशन सेंटर, शिवणकामाचे दुकान किंवा इतर कोणताही व्यवसाय उघडण्यासाठी मुद्रा लोनमधून कर्ज घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. हे कर्ज तुम्हाला तीन कॅटेगरीमध्ये मिळू शकते. - मुद्रा लोनसाठीच्या तीन कॅटेगरी कोणत्या? - शिशू कर्ज- कर्जाची रक्कम कमाल 50,000 रुपयांपर्यंत असू शकते. - किशोर कर्ज- तुम्ही 50,000 ते 5 लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. - तरुण कर्ज- जर तुम्ही आधीच व्यवसाय करत असाल आणि त्याचा विस्तार करू इच्छित असाल तर तुम्हाला यातून 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. 2. अन्नपूर्णा योजना: एखाद्या महिलेला खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसाय करायचा असेल तर तिला भारत सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. कर्ज मंजूर झाल्यानंतर, पहिल्या महिन्यासाठी इएमआय (EMI) भरण्याची गरज नाही. हा हप्ता 36 मासिक इएमआयमध्ये भरावा लागेल. त्याचा व्याजदर बाजार दर आणि बँकेच्या आधारे ठरवला जातो. 3. स्त्री शक्ती योजना: या योजनेत सरकार महिला उद्योजकांना मदत करते. जर एखादी महिला संयुक्त अर्थात जॉईंट व्यवसायात एकापेक्षा जास्त भागधारक असतील तर ती हे कर्ज घेऊ शकते. यासोबतच त्यांना इडीपीसाठी राज्य सरकारकडे नोंदणी करावी लागेल. यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त कर्जावर 0.05% व्याज सवलत मिळते. 4. स्टँड अप इंडिया योजना: 2016 मध्ये ही योजना महिला आणि एससी-एसटी कॅटेगरीतील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. यामध्ये केवळ ग्रीन फील्ड प्रोजेक्ट्ससाठी म्हणजेच पहिल्यांदा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कर्ज उपलब्ध आहे. कर्जाची रक्कम 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असू शकते. 👉🏻तुम्हालाही व्यवसाय करायचा आहे आणि पुरेसं भांडवल नाही तर तुम्ही या योजनांचा विचार करु शकता. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
1
इतर लेख