AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महिलांना मिळते 6 हजार रुपयांची आर्थिक मदत !वाचा सविस्तर !
योजना व अनुदानAgrostar
महिलांना मिळते 6 हजार रुपयांची आर्थिक मदत !वाचा सविस्तर !
➡️केंद्र आणि राज्य सरकार समाजातील सगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणत असतात. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी देखील एक नवनवीन योजना आणत असून याचाच एक भाग म्हणून मुलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात सन 2017 या वर्षी करण्यात आली. ➡️या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. यामागे सरकारचा उद्देश आहे की महिलांनी स्वावलंबी व्हावे व ज्यांच्याकडे रोजगाराचे साधन नाही त्यांना मदत व्हावी हा उद्देश आहे. ➡️प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना : या योजनेच्या माध्यमातून आई आपल्या बाळाची काळजी घेऊ शकते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार तीन हप्त्यांमध्ये पैसे महिलांच्या खात्यात ट्रान्सफर करते.या योजनेत गर्भवती महिला अर्ज करु शकतात. ➡️गरोदर महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांकडे आधार कार्ड,पालकांचे ओळखपत्र, मुलाचा जन्म दाखला, बँक खाते पासबुक असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना एक जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आली. योजना प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना म्हणून देखील ओळखली जाते. ➡️तीन हप्त्यांमध्ये मिळतात पैसे : या योजनेचा उद्देश्य आई आणि मूल दोघांचीही चांगली काळजी घेणे हा असून सरकार या योजनेच्या माध्यमातून तीन टप्प्यात आर्थिक मदत करते. यामध्ये पहिला टप्पा एक हजार रुपयाचा,दुसरा टप्पा दोन हजार रुपयाचा आणि तिसर्‍या टप्प्यात दोन हजार रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. सोबतच बाळाच्या जन्माच्या वेळी सरकार शेवटचे एक हजार रुपये रुग्णालयाला देते. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
7
इतर लेख