कृषि वार्तादैनिक भास्कर
महिन्याभरानंतर पुन्हा कांदे झाले महाग!
महिन्याभरानंतर जवळपास कांदे पुन्हा महाग झाले आहेत. कारण कर्नाटकवरून कांदे येत नाही व नाशिकमध्ये पुन्हा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले असून, कांदयाची आवाक थांबली आहे. नाशिकमधील ओल्या कांदयाने देशभरातील बाजारात कांदयाची किंमती वाढविल्या आहेत. रविवारी बाजारपेठेत कांदयाचे भाव ५० रू. प्रतिकिलोवर पोहोचले.
पुढील एक आठवडयात या किंमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दिवाळीनंतर कित्येक वर्षानंतर कांदयाच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशात कांदयाचे भाव हे महाराष्ट्रातील बाजारपेठेनुसार ठरतात. नाशिक व लासलगाव बाजारपेठेत कांदयाच्या किंमती वेगाने वाढत आहे. यासोबतच देशात ही कांदयाचे उत्पादन कमी झाले आहे. संदर्भ – दैनिक भास्कर, ४ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा
32
0
इतर लेख