AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
५ महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य योजना; पहा सविस्तर!
कृषी वार्ताडेलिहंट
५ महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य योजना; पहा सविस्तर!
➡️ कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्याची योजना राबविली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली होती. या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. या अन्नधान्य वाटपाच्या योजनेचा देशभरातील ८१ कोटी ३५ लाख नागरिकांना लाभ होणार आहे. ➡️ दरमहा प्रती व्यक्ती ५ किलो धान्य योजनेअंतर्गत दिले जाईल. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेसाठी पात्र असलेल्या लोकांना योजनेनुसार पुढील पाच महिने मोफत धान्य मिळणार आहे. योजना राबविण्यासाठी ६७ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च येणार असून तेवढा भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डेलिहंट हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
12
इतर लेख