AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
महिनाअखेर पावसाची शक्यता आहे का?
➡️राज्यातील अनेक शहरांचे तापमान कमी होऊन थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मागील महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवु लागला होता. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून नागरीकांना ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळू लागला आहे. ➡️हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार,राज्यात पुढील काही दिवस काही भागात ढगाळ वातावरण तसेच तुरळक पावसाची शक्यता असेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमी होऊ लागले आहे. राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. तसेच दोन दिवसांत राज्यातील तापमानात घसरण होणार आहे. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
7