AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महिनाअखेर कांदयाच्या किंमती होणार कमी
कृषि वार्तालोकमत
महिनाअखेर कांदयाच्या किंमती होणार कमी
मुंबई – अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने किरकोळ बाजारात १०० रू. किलोवर पोहोचलेला व आता ६०-६५ रू. असलेल्या कांदयाचा राज्यात पुरवठा वाढल्याने महिनाअखेर ५० रू. खाली येण्याची स्थिती आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये कांदयाची आवक वाढत असून, मालाचा दर्जाही चांगला असल्याने देशभरात लवकरच सुरळीत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने कांदयाच्या लागवडीस व पिकालाही मोठा फटका बसला. साहजिकच खरिपाचे उत्पादन घटून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात राज्यात कांदयाची आवक २५ लाख क्विंटल म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आली होती. नोव्हेंबर महिन्यात आवक वाढून ४० लाख क्विंटल झाली. तरीही त्यात सुमारे २५ ते ३० टक्के घट होती. जानेवारीत आता आवक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. संदर्भ – लोकमत, १४ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0