AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महिंद्राची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार!
ऑटोमोबाईललोकमत
महिंद्राची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार!
➡️महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनेही इलेक्ट्रिक कार सादर करणार असल्याचे म्हटले होते. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी लवकरच जर्मन या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार उत्पादन सुरू करणार आहे. कंपनीने यासाठी निधी उभारण्यासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. ➡️बॅटीस्टा ही हायपर इलेक्ट्रिक कार आहे. या कारचा पहिला प्रोटोटाइप २०१९ च्या जिनिव्हा ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या इलेक्ट्रिक कारची टॉप स्पीड ३५० किमी प्रति तास आहे. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड ३५० किमी प्रतितास आहे ➡️महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. ➡️आनंद महिंद्रा यांनी केवळ १२ सेकंदात ३०० किमीचा वेग पकडणाऱ्या अशा शानदार इलेक्ट्रिक कारचे फोटो शेअर केले आहेत. ➡️पिनिनफारिना बॅटिस्टा इलेक्ट्रिक कारमध्ये १२० किलोवॅटची लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. ही कार १९०० एचपी पॉवर जनरेट करते. ➡️या कारमध्ये चार इलेक्ट्रिक मोटर्स असून कारच्या चार चाकांना वेगवेगळी ऊर्जा पुरवतात. कंपनीच्या दाव्यानुसार, पिनिनफारिना बॅटिस्टा केवळ २ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवते. ➡️१२ सेकंदात ३०० किमी प्रतितास वेग गाठू शकतो. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड ३५० किमी प्रतितास आहे. पिनिनफारिना बॅटिस्टा इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे २२ लाख डॉलर (जवळपास १६.३५ कोटी रुपये) आहे. संदर्भ:-लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
1