कृषि वार्ताAgrostar
महाराष्ट्र राज्यात लम्पीची दुसरी लाट!
🐄काही महिन्यापूर्वी लम्पी आजारामुळे जनावरांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागला होता. प्रशासनाकडून याची दखल घेत गंभीर उपायोजना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकराने लसीकरण राबवत लम्पी नियंत्रणात आल्याचा दावा केला होता पण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लम्पी डोके वर काढत आहे. राज्यात पुन्हा एकदा लम्पीची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
🐄लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा या गावात जनावरांमध्ये लम्पीचे प्रादुर्भाव दिसून आला आहे. साकोळ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत १३ पशूंचा मृत्यू झालेला असून, १६ जनावरे गंभीर आजारी आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे.
🐄सोबतच जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पशुधनाला लंम्पीच्या आजाराचा विळखा पडला आहे. सद्यस्थितीला १०२ लंम्पीग्रस्त जनावरे असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
🐄लम्पी रोग पसरू नये म्हणून प्रशासनाकडून जनावरांच्या बाजारांवर बंदी घालण्यात आली होती. लसीकरण करण्यात आल्यावर साथ रोग आटोक्यात आली होती. मात्र मार्च महिन्याच्या नंतर काही ठिकाणी पुन्हा प्रदुर्भाव दिसून येऊ लागला आहे. या घटनेत नवजात वासरे यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. प्रशासनाकडून पुन्हा एकदा जोमाने उपाय योजना सुरू आहेत. ज्या पशूंचे लसीकरण झाले आहे त्यांच्यात मृत्येचे प्रमाण दिसून येत नाही. मात्र ज्या पशूंचे लसीकरण झाले नाही अशा जनावरांना लम्पीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
🐄मार्च महिन्यापासून जिल्हाभरात आतापर्यंत १२३६ नवीन लम्पी बाधित जनावरे आढळून आले आहेत. त्यापैकी १४५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बाकी जनावरे उपचारानंतर ठीक झाले आहेत. यात सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण शिरूर अनंतपाळ तालुक्यातील भागात दिसून येत आहे.
🐄जनावरांची अशी घ्या काळजी :
👉नवीन आणलेले पशू असतील किंवा नवजात वासरे असतील तर त्यांचे तात्काळ लसीकरण करून घ्या.
👉आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधावा.
👉पशुपालकांनी घाबरून न जाता योग्य वेळी औषध उपचार करून घेऊन आपल्या पशुचे रक्षण करावे.
👉संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.