हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्र राज्यात पावसाचं पुनरागमन!
➡️यावर्षी मान्सूनची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर सुरुवातच निराशाजनक झालेली होती. जून महिना संपूर्ण कोरडा गेला होता व त्यानंतर जुलै महिन्याची सुरुवात चांगल्या पावसाने झाली व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग येऊन पेरण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत.
➡️परंतु सध्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी पिके कोमेजू लागली असून शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की आता पाऊस कधी सुरू होईल? परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
➡️महाराष्ट्रात 18 ऑगस्ट पासून पावसाची शक्यता असून 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे या कालावधीत विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
➡️संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.