महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना!
योजना व अनुदानAgrostar
महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना!
👉🏻 राज्यातील अपंग लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अपंग दिव्यांग पेन्शन योजना राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. ✔️अपंग पेन्शन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार अर्जदार लाभार्थ्याला प्रतिमहा ६००/- रुपयांची पेन्शन देणार आहे. ✔️८० टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. ✔️ही पेन्शन रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यासाठी अर्जदार लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे. 👉🏻महाराष्ट्र अपंग योजनेसाठी आवश्यक पात्रता: ✔️अर्ज करणारा अपंग व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ✔️अपंग अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. ✔️अर्जदार अपंग कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३५,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे. ✔️जर अपंग व्यक्तीला सरकारी नोकरी असेल, तर तो या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही. ✔️या योजनेअंतर्गत ८० टक्के अपंगत्व असलेला व्यक्तीच अर्ज करून लाभ घेऊ शकतो. 👉🏻 आवश्यक कागदपत्रे : १.आधार कार्ड २.मोबाईल नंबर ३.अपंगत्वाचे प्रमाणपत्र ४.उत्पन्नाचा दाखला ५.पासपोर्ट आकाराचे फोटो ६.ओळखपत्र ७.वय प्रमाणपत्र ८.बँक खाते पासबुक 👉🏻 ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत: ✔️अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल. ✔️या कार्यालयांमध्ये तुम्हाला अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म मिळेल. ✔️फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरून नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून ती तुम्हाला जिल्हाधिकारी /तहसीलदार/तलाठी कार्यालयामध्ये जमा करावी लागतील. ✔️तुमचा फॉर्म या कार्यालयांमध्ये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. ✔️अर्जाची पडताळणीनंतर तुमची पेन्शन सुरु केली जाईल. 👉🏻अधिक माहितीसाठी क्लिक करा : sjsa.maharashtra.gov.in 👉🏻संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
17
इतर लेख