AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट!
हवामान अपडेटAgroStar
महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट!
👉🏻राज्यात कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. हिवाळा गेल्यानंतर आता उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वैशाख वणव्याच्या झळा बसायला झाली आहे. त्यातच पहाटेच्या व रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट होत आहे.या वातावरणात चिंता निर्माण करणारी बातमी आली आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 17 ते19 मार्च दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहणार आहे. 👉🏻हवामान विभागाने तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यात अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आवकाळी पावसाची शक्यता आहे. 👉🏻सध्या ज्वारीच्या काढणीचा हंगाम सुरू आहे, तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.दरम्यान उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली आहे, सूर्याच्या आगीत होरपळणाऱ्या विदर्भाला या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 👉🏻हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदानुसार महाराष्ट्राप्रमाणेच जम्मू - काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.17 मार्चला झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पावसासोबतच बर्फवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
1