AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा!
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा!
🌨️एकीकडे थंडीचा कडाका वाढला असता दुसरीकडे अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहे. गेल्या चार पाच दिवसात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.ज्याचा रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. राज्यावर अवकाळीचे सावट अद्यापही कायम आहे. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर धुळे आणि नंदूरबारमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 🌨️राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खान्देशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये आज तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ वगळता राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 🌨️याशिवाय पुढील तीन दिवसानंतर ढगाळ वातावरण कमी झाल्याने पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे. 🌨️दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या चार पाच दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. अवकाळीमुळे तापमानाचा पारा घसरला असून यामुळे थंडी वाढली आहे. पुढील तीन दिवसात आणखी थंडी वाढणार आहे. 🌨️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
0