AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात 'या' दिवशी होणार पावसाचं आगमन  !
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रात 'या' दिवशी होणार पावसाचं आगमन !
🌨️एकिकडे राज्यातील काही भागात उन्हाचा कडाका लागला आहेत. तर दुसरीकडे पावसाचीही परिस्थीती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवस आधीच सोमवारी मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात पावसाचंआगमन कधी होतंय. याची उत्सुकता लागली आहे. तर मान्सूनचे अंदमानात आगमन झालेलं असतानाच आता केरळातही तो 25 ते 27 मे या दिवसा दरम्यान पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 🌨️महाराष्ट्रावर मॉन्सूनचे आगमन : 🌨️ हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. मात्र, हा मान्सून नसून, अवकाळी पाऊस आहे. परिणामी या पावसाला मान्सून समजण्याची चूक करु नका कारण, या पावसानंतर तापमानात वाढ झाल्याचे निरिक्षणास आल्याचे पाहायला मिळत आहे. 🌨️मान्सूनसाठी सर्व परिस्थिती पूरक असल्यामुळे त्याचा प्रवास हा अतिशय वेगाने होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये आल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात येण्यास फार वेळ जाणार नाही असं देखील सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची दिशा आणि त्यांना मिळालेली गती पाहता 10 जून ऐवजी तळकोकण आणि बहुतांश कोकण किनारपट्टी भागात मान्सून 2 जूनला धडकणार असल्याची चिन्हे आहेत. असं हवामान खात्याने सांगितलं आहे. 🌨️यंदाचा उन्हाळा महाराष्ट्रातील बहुतेक भागात जाचक राहिला मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी नेहमीसारख्या पडल्याच नाहीत पुष्कळ ठिकाणी, विशेषतः विदर्भात नोंदल्या गेलेल्या उच्चांकी कमाल तापमानाने अनेक रेकॉर्ड मोडले आता लवकर येणाऱ्या मॉन्सूनमुळे मागील अनेक आठवडे चालू राहिलेती उष्णतेची लहर संपुष्टात येण्याची आणि तिच्यापासून होत असलेल्या त्रासापासून सुटका मिळायची संभावना चांगली आहे. आत्ताची परिस्थिती देशातील शेतीसाठी आणि विशेषत शेतकऱ्यांचे मनोबत वाढवण्याच्या दृष्टीने खूप आशादायक आहे. 🌨️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
105
12
इतर लेख