AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात या ठिकाणी पावसाची शक्यता!
कृषी वार्ताडॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
महाराष्ट्रात या ठिकाणी पावसाची शक्यता!
महाराष्ट्रातील हवेचे दाब उत्तरेस १००२ व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल रविवारी व सोमवारी म्हणजेच आज व उद्या राहील. महाराष्ट्रात सर्वच भागात दिवसा सूर्यप्रकाशाचा कालावधी अधिक काळ राहणे शक्य आहे.तशीच स्थिती आठवडा अखेर पर्यंत राहील.हवामान अंशतः ढगाळ राहील .सकाळची सापेक्ष आद्रता ८० टक्क्यावर व दुपारची ६० ते ७० टक्के राहील.. कोकण - रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत रविवारी ८ऑगस्ट रोजी ४१ ते ४८ मी मी पावसाची शक्यता आहे. तर सोमवारी पावसाचे प्रमाण केवळ १४ मी मी राहणे शक्य आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११-१७ मी मी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र : रविवारी नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगावजिल्ह्यात रविवारी १३ ते १८ मी मी पावसाची शक्यता आहे.तर सोमवारी ६ते १० मी मी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा : उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात रविवारी व सोमवारी पावसाची उघडीप राहील पावसाची शक्यता नाही. परभणी, बीड, जालना, लातूर हिंगोली व औरंगाबाद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ : बुलढाणा, जिल्ह्यात रविवारी १७ मी मी, अकोला १४ मि मी व अमरावती १९ मी मी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य विदर्भ : यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ६ते ७ मी मी, नागपूर १४ मी मी व यवतमाळ ४ते ७ मी मी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्व विदर्भ: गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १५ ते १६ मी मी पावसाची शक्यता आहे.तसेच चंद्रपूर लिहण्यात १० मी मी, पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र: रविवारी कोल्हापूर जिल्यात २७ मी मी पावसाची शक्यता असून सोमवारी १७ मी मी पावसाची शक्यता आहे.उर्वरित सांगली, सातारा, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत रविवारी ६ते ८ पावसाची शक्यता आहे. कृषी सल्ला - १)अशा प्रकारची हवामान स्थिती किडींचे मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव होण्यास अनुकूल राहील. २) ऊसावर लोकरीमाव्याचा आणि सोयाबीन पिकात पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल राहील. ३) इतर पिकात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढेल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
130
16