क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताडॉ .साबळे कृषी हवामान तज्ञ
महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता!
➡️मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ढगाळ वातावरणाची स्थिती कमी झाली आहे. मात्र कोकणात व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अजूनही अंशतः ढगाळ वातावरण आहे. ➡️आज आणि उद्या कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. ➡️सध्या मध्य महाराष्ट्र व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती काही प्रमाणात आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. मध्य प्रदेशाच्या आग्नेय भाग व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती ही आहे. ➡️यामुळे अरबी समुद्राकडील बाष्पयुक्त वारे खेचले जात असल्याने कोकणातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र मराठवाडा व विदर्भात कोरडे वातावरण असल्याने उकाडा वाढला आहे. यामुळे मागील चार ते पाच दिवस कमी झालेला कमाल व किमान तापमानाचा पारा पुन्हा काही प्रमाणात वाढला आहे. गुरुवारी सकाळी चोवीस तासांत रत्नागिरी येथे ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. ➡️कोकणात व मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी पेक्षा अधिक म्हणजेच ४० अंश सेल्सिअस अथवा त्याहून अधिक वाढेल.या आठवड्यात उष्ण लहरींचा प्रभाव जाणवणार नाही.कमाल व किमान तापमानात होणाऱ्या वाढीमुळे सापेक्ष आद्रतेत मोठ्या प्रमाणात घट होईल.त्यामुळे उष्ण व कोरडे हवामान जाणवले. ➡️वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयकडून राहील.याच आठवड्याचे उत्तरार्धात उत्तरभारतातील व पूर्वकिनारपट्टीवरील हवेचे दाब कमी राहतील.साहजिकच वाऱ्याची दिशा नैऋत्येकडे राहील. या वर्षी मान्सूनवारे आपला रस्ता बनवण्याचे काम लवकर करतील. संदर्भ - डॉ .साबळे कृषी हवामान तज्ञ, हवामान पूर्वानुमान विषयी अधिक महत्वाच्या बातम्या जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
55
9
संबंधित लेख