AgroStar
महाराष्ट्रात मान्सून दाखल; या भागात होणार जोरदार पाऊस!
हवामान अपडेटअ‍ॅग्रोवन
महाराष्ट्रात मान्सून दाखल; या भागात होणार जोरदार पाऊस!
➡️ महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्याने बहुतांशी भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात काही अंशी ऊन व ढगाळ हवामान असल्याने तापमानात चांगलीच घट झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कमी अधिक पाऊस पडेल. कोकणात व घाटमाथ्यावर पावसाचा बऱ्यापैकी जोर राहील असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. ➡️ राज्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागांत चांगलेच बदल झाले होते. त्यातच आता मॉन्सून दाखल झाल्याने उन्हाचा चटका कमी होऊ लागला आहे. विदर्भात पारा कमालीचा घटला आहे. या भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यानंतर तिसऱ्यांदा ४० अंश सेल्सिअसपेक्षा खाली आला आहे. पावसाळा सुरू झाल्याने या भागांत तापमान आता कमी राहण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. ६) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील नागपूर येथे ३७.२ अंश सेल्सिअसी सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. ➡️ सध्या राज्यातील बहुतांशी भागात होत असलेल्या पावसामुळे उकाडा कमी झाला आहे. त्यामुळे कमाल तापमानासह, किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. विदर्भात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने, तर उर्वरित भागांत एक ते तीन अंश सेल्सिअसने पारा घसरला आहे. महाबळेश्‍वर येथे १६.७ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस सोमवार :- मध्य महाराष्ट्र, विदर्भ मंगळवार :- संपूर्ण विदर्भ बुधवार :- संपूर्ण विदर्भ गुरुवार :- कोकण, विदर्भ संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
58
14
इतर लेख