AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!
महाराष्ट्रात या आठवड्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भात पावसाची शक्यता राहील. वादळी वाऱ्यासह थोड्या कालावधीत तुरळक ठिकाणी अधिक पाऊस होईल. मान्सूनचे आगमनास एक महिना बाकी असून या वर्षीय मान्सून दिलासादायक ठरेल असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच घोषित केले आहे. औद्योगीक क्रांतीचे सुरुवातीस मान्सूनसाठी जसे हवामान होते तसे या वर्षी राहील. त्यामुळे सुरुवातीचे टप्प्यात मान्सूनवर या वर्षी हवामान बदलाचा प्रभाव राहणार नाही. बंगालचे उपसागरात व हिंदी महासागरात दिनांक ७ मे रोजी चक्रीय वादळाची निर्मिती होईल. या पुढील काळात वादळाची निर्मिती सुरु होईल. पुणे जिल्हा:- पुणे जिल्ह्यामध्ये १ मे रोजी १० मी.मी तर ३ मे रोजी १२ मी. मी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापुढेही काही तुरळक ठिकाणी पाऊस होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकण:- कोकणात पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ ते २३ मी.मी, रत्नागिरी - ७ ते १३ मी.मी, रायगड - ५ ते ६ मी.मी, ठाणे - ७ मी.मी एवढा या आठवड्यात काही दिवशी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा तशी वेग ४ ते ८ किलोमीटर राहील. तसेच आकाश अंशतः ढगाळ राहील. उत्तर महाराष्ट्र:- नाशिक व धुळे जिल्ह्यात दिनांक ३ मे रोजी ६ मी.मी पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे. तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. मराठवाडा:- औरंगाबाद जिल्ह्यात या आठवड्यात काही दिवशी ४ ते १४ मी.मी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. तसेच हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत कमाल ४३ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस तापमान राहील तर किमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. पश्चिम विदर्भ:- बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यात कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तर किमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. एकूणच या ठिकाणचे हवामान उष्ण व कोरडे राहील. पावसाची शक्यता कमी आहे.
मध्य विदर्भ:- मध्य विदर्भात हा आठवडा अतिउष्ण असेल सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअल तर किमान २७ ते २८ अंश सेल्सिअल राहील. त्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे._x000D_ वरील हवामानाच्या अंदाजानुसार शेतकरी बंधूंनी, हळद, आले, पानमळा लागवडीची तयारी करावी, एप्रिल व मे महिन्यात निशिगंधाची लागवड करावी. फळबाग लागवडीची सुरुवात करावी. तसेच उन्हाळी हंगामात पाण्याची गरज वाढते त्यामुळे ठिबकचा कालावधी वाढवावा._x000D_ संदर्भ:- डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) _x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
141
0
इतर लेख