AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात चढणार तापमानाचा पारा!
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रात चढणार तापमानाचा पारा!
✅राज्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये देखील सातत्याने तापमानात वाढ होताना दिसत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. ✅येत्या दिवसातील महाराष्ट्रातील 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान च्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, तापमानात लक्षणीय वाढ होईल. यामध्ये अकोला,बुलढाणा,धुळे,गडचिरोली,हिंगोली,जळगाव,नांदेड,नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, परभणी,ठाणे, सिंधदुर्ग या जिल्ह्यात लक्षणीय वाढ दिसून येईल. ✅अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पिकला वेळोवेळी पाणी देणे देखील फायद्याचे राहील. ✅संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख