हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रात चढणार तापमानाचा पारा!
✅जानेवारी महिन्यात राज्यात थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात होता. याचबरोबर जानेवारी महिन्याच्या शेवटी राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला होता. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे.
✅येत्या दिवसातील महाराष्ट्रातील 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान च्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, तापमानात लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज आहे की तापमान सुमारे 31 ते 36 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता
आहे. यामध्ये अहमदनगर,नाशिक,उस्मानाबाद,पालघर,पुणे,रायगड,रत्नागिरी,सातारा,सिंधुदुर्ग,सोलापूर,ठाणे या जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
◆ जर तुमची पिके अजून पक्व्तेच्या अवस्थेत असतील तर त्यांच्यासाठी चांगले हवामान असेल.
◆ जर तुम्ही पावसाची वाट पाहत असाल तर या आठवड्यात पावसाची विशेष शक्यता नाही. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी द्या.
✅संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.