AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात अति उष्ण, कोरडे हवामान व पावसाची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
महाराष्ट्रात अति उष्ण, कोरडे हवामान व पावसाची शक्यता!
• महाराष्ट्रात हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल राहील। त्यामुळे वारे नैऋत्य, आग्नेय दिशेकडून उत्तर भारताच्या दिशेने वाहतील व अशा प्रकारे वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन मान्सूनसाठी हे वारे अनुकूल ठरतील. त्यामुळेच मान्सूनचे आगमन वेळेवर होईल. तसेच मान्सून वेगाने उत्तर भारताच्या दिशेने सरकेल असेच संकेत आहेत. • या आठवड्यात संपूर्ण विदर्भात पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. दिवसाचा कालावधी जवळपास १३ तासांचा राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. दिवस व रात्री उष्णता जाणवेल. उष्णलहरी व उष्णतेच्या लाटा जाणवतील. "• महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेड तसेच पश्चिम महाराष्ट्रात दिनांक ११ मे रोजी मेघगर्जनेसह अल्पशा पावसाची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात काही भागात हवामान अल्पकाळ ढगाळ राहील। अतिउष्ण व कोरडे हवामान हे या आठवड्याचे वैशिष्ट्ये राहील. • तसेच बीड, परभणी व जालना जिल्ह्यात वाऱ्याचा तशी वेग ११ ते १५ किलोमीटर राहील. किमान तापमानातही या आठवड्यात वाढ होईल. कोकणातील रायगड व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. • तसेच महाराष्ट्रातील, नाशिक, धुळे, नंदुरबार, नांदेड, औरंगाबाद, अकोला या जिल्यांमध्ये अल्पशा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य विदर्भात ४६ अंश सेल्सिअस पर्यन्त तापमान राहील.
संदर्भ:- डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
0
इतर लेख