कृषी वार्ताTV9 Marathi
महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज!
➡️राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. १० हजार कोटींचे पॅकेजची घोषणा! अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. राज्य सरकारच्या मदतीचं स्वरुप! ➡️जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर ➡️बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर ➡️बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर ➡️ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
2
इतर लेख