AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा !
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा !
➡️देशातील बळीराजा वाट पाहत असलेला मान्सून यंदा वेळेवर दाखल झाला आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही वरुणराजा बरसताना दिसत नाही. त्यामुळे काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेती कामे उरकली आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. येत्या ४ दिवसांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. ➡️महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर राज्यात अजून काही ठिकाणी पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत. भारतीय हवामान खात्याकडून देशातील काही राज्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ➡️आय एम डी चा या राज्यांसाठी अलर्ट : भारतीय हवामान खात्यानेही पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार या राज्यांव्यतिरिक्त 24 ते 27 जुलै दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि यूपीमध्येही पावसाचा इशारा दिला आहे. ➡️गेल्या २४ तासांत या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस गेल्या २४ तासांत पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे. छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कोकण आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी झाली आहे. यासह, पश्चिम राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, कर्नाटकचे दक्षिण अंतर्गत भाग, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि पंजाबमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
5
इतर लेख