AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्राचा हवामान अंदाज!
अॅग्रोस्टार रेडियोAgrostar
महाराष्ट्राचा हवामान अंदाज!
➡️आजची मंगळवार ची खास प्रस्तुती. हवामान अंदाज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील येत्या दिवसातील हवामान बदला विषयी.. ➡️सध्या महाराष्ट्रामध्ये पूर्व दिशेने थंड वारे वाहत आहेत. परंतु वातावरणातील बदल लक्ष्यात घेता. आता तरी सर्व ठिकाणी वातावरण कोरडे राहील. परतीच्या पावसाने शेवटच्या सत्रात अक्षरश: झोडपून काढले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. गेली चार महिने पावसानं चिंब भिजवल्यानंतर आता राज्यात हिवाळा सुरू झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर एकाच आठवड्यात थंडीचा कडाका वाढलाय. ➡️परंतु येत्या काही दिवसात कोल्हापूर. सातारा. सिंधदुर्ग. सांगली. रत्नागिरी आणि सोलापूर या भागात ढगाळ वातावरण राहील. आणि हवामानअंदाजानुसार या ठिकाणी येत्या काही दिवसात हलका पाऊस देखील होऊ शकतो. ➡️त्यांनतर म्हणजेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ➡️आजची खास माहिती येथे समाप्त होत आहे. कृषी संबंधी ताज्या बातम्या साठी अ‍ॅग्रोस्टार सोबत जोडलेले राहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान मधील अन्य लेख ऐका. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0