योजना व अनुदानAgrostar
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना!
➡️राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामधून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या घोषणांमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा योजना सामान्यांसाठी सर्वात 'आरोग्यदायी' राहिलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना संदर्भातील आहे. या योजनेतून आता पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य खासगी दवाखान्यातील लाखोंची बिले अदा करण्यापेक्षा या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार करून घेता येणार आहे. जन आरोग्य योजनेचं विमा संरक्षण दीड लाखांहून पाच लाख रुपये करण्यात आलं आहे.
➡️या योजनेमध्ये आणखी 200 नव्या रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली जाणार आहे. दुसरीकडे, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियाचा लाभही अडीच लाखांवरून 4 लाखांपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भात जे कोणी लाभ घेऊ इच्छित असतील किंवा जे प्रतीक्षेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ होईल.
➡️महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
👉🏼सर्व प्रथम, आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
👉🏼आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
👉🏼मुख्य पृष्ठावर, आपल्याला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
👉🏼त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पृष्ठ दिसेल, त्यामध्ये तुम्हाला युजर आईडी पासवर्ड भरावा लागेल.
👉🏼त्यानंतर लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
👉🏼अश्या प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन होईल.
👉🏼रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
👉🏼लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन फॉर्म स्क्रीनवर उघडेल.
👉🏼यामध्ये आपल्याला स्वतःशी संबंधित सर्व माहिती तयार करावी लागेल आणि सर्व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
👉🏼यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
👉🏼मित्रांनो सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणीकृत असाल आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार मिळू शकतात.
➡️महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे असणार आहेत.
👉🏼आधार कार्ड
👉🏼रेशन कार्ड
👉🏼सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या आजाराचे प्रमाणपत्र
👉🏼वय प्रमाणपत्र
👉🏼अर्जदाराची तीन पासपोर्ट आकाराची फोटो
👉🏼उत्पन्न प्रमाणपत्र
➡️ महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची ऑफिशियल वेबसाइट –
https://www.jeevandayee.gov.in/
➡️संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.