कृषि वार्ताAgroStar
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल नेमके कशासाठी आहे?
👉🏻महाडीबीटी शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेले एक महत्वाचे तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचे असे पोर्टल आहे.काही वर्षांपूर्वी कृषी योजनांचा लाभ मिळविण्याकरीता शेतकऱ्यांना विविध पोर्टल वर जाणून अर्ज सादर करावा लागत होता त्यामधील खूप साऱ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचत देखील नव्हती त्यामुळे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित रहायचे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कृषी विभागाने Mahadbt Farmer Login हे पोर्टल सुरु केले आहे.
👉🏻राज्यात सुरु करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजनांची माहिती Mahadbt Farmer Login वर उपलब्ध केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी विविध पोर्टल वर जाण्याची गरज भासणार नाही व ते कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत. या पोर्टल वर शेतकऱ्यांना एकदाच नोंदणी करून भविष्यात सुरु करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजनांचा लाभ घेता येतो.
👉🏻महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जातीचा दाखला
- जमिनीचा दाखला 7/12 व 8अ
- उत्पनाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- पिकाची माहिती
- डोमेसाइल प्रमाणपत्र
- कुटुंबाची माहिती
👉🏻महाडीबीटी पोर्टल वर नवीन नोंदणी करण्याची पद्धत:
- अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin वर जावे लागेल.
- होम पेज वर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर नवीन अर्जदार नोंदणी अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (अर्जदाराचे नाव, वापरकर्त्याचे नाव, पासवर्ड, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, OTP) भरून नोंदणी करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक पर्याय उघडेल
- त्यामध्ये तुम्हाला No वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन नोंदणी अर्ज उघडेल (Non Aadhaar) त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून जतन करा वर क्लिक करावे.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.