क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तालोकमत
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनेबाबत शेतकऱ्यांना आवाहन!
👉सातारा : महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर लघु संदेश देण्यात आलेला असून निवड झाल्याचा संदेश ज्या शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे, अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर जाऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे. 👉यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 👉राज्य शासनाच्या महाडीबीटीवर शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत विविध कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 👉या सुविधेंतर्गत लाभार्थींनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे, कृषी विभागाने पोर्टलवर अर्ज करण्याची तारीख ११ जानेवारी ही अंतिम होती. 👉त्यानुसार प्राप्त सर्व अर्जांसाठी लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने कृषी यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी नवीन विहिरी, कांदाचाळ, प्लास्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचा समावेश आहे. संदर्भ -लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
49
7
संबंधित लेख