AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महागाईची झळ, LPG सिलिंडर महागला!
समाचारTV9 Marathi
महागाईची झळ, LPG सिलिंडर महागला!
➡️सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्य माणसाला मोठा झटका बसलाय. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ झालीय. ➡️यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 15 दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झालेत. ➡️दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 859.50 रुपयांवरून 884.50 रुपये झाली. ➡️दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 1,649 रुपये प्रति सिलिंडर आहे. एलपीजी सिलिंडर यंदा 190.5 रुपयांनी महागले ➡️वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 9 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली. सीएनजी-पीएनजीच्या किमती वाढल्या ➡️29 ऑगस्ट रोजी सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ केली. LPG ची किंमत कशी तपासायची? ➡️एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3