गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मल्चिंग पेपर वर पीक लागवड करताना घ्यावयाची काळजी!
➡️ज्या ठिकाणी ड्रीप आणि मल्चिंग चा वापर करणार आहे तिथे रोपांची अथवा बियाण्याची लागवड करण्यापूर्वी शेताची पूर्णपणे मशागत करून बेड मध्ये खतांची मात्रा देऊन बेड पूर्णपणे तयार करून घ्यावे.
➡️त्यानंतर त्यावर ड्रीप संचाची मांडणी करून 10 ते 15 मिनिटे पाणी सोडून एकदा ड्रीप संच तपासून घ्यावा त्यानंतर मल्चिंग पेपर टाकावा.
➡️मल्चिंग पेपर टाकल्यानंतर लगेच होल न पाडता एक दिवस पेपर पूर्णपणे उन्हात तापून द्यावा व दुसऱ्या दिवशी ठिबक मधून पाणी सोडावे.
➡️पाणी सोडल्यानंतर पेपर ला होल नसल्यामुळे आतमध्ये वाफ तयार होऊन जमिनीतील कीड व रोग नियंत्रणास मदत होते.
➡️त्यानंतर तिसऱ्या दिवशी पेपर ला होल पाडून पुन्हा पाणी सोडावे जेणेकरून आतील वाफ बाहेर पडली जाईल व त्यांनतर चौथ्या दिवशी जमिनीत वापसा असताना रोपांची लागवड करावी.
➡️असे केल्यामुळे जमिनीतील उष्णता कमी होऊन रोपांची मर होणार नाही.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.