AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मल्चिंगसह शेत तयार करण्याची योग्य पद्धत!
गुरु ज्ञानAgrostar
मल्चिंगसह शेत तयार करण्याची योग्य पद्धत!
👉🏻ज्या ठिकाणी ड्रीप आणि मल्चिंगचा वापर करायचा आहे, त्या ठिकाणी लागवडीपूर्वी शेताची पूर्ण मशागत करून बेड तयार करावा. बेडमध्ये खतांची मात्रा दिल्यानंतर त्यावर ड्रीप संचाची मांडणी करावी आणि 10 ते 15 मिनिटे पाणी सोडून एकदा ड्रीप संच तपासावा. त्यानंतर मल्चिंग पेपर टाकून एक दिवस ते तापण्यासाठी उन्हात ठेवा. 👉🏻मल्चिंग पेपर टाकल्यानंतर लगेच छिद्र न करता, दुसऱ्या दिवशी ठिबकद्वारे पाणी सोडावे. पाणी सोडल्यावर, पेपरमध्ये छिद्र नसल्यामुळे आत वाफ तयार होते, ज्यामुळे जमिनीत असलेल्या किडी आणि रोगांचे नियंत्रण होते. तिसऱ्या दिवशी पेपरला छिद्र पाडून पुन्हा पाणी सोडावे, ज्यामुळे आतील वाफ बाहेर पडतो. चौथ्या दिवशी जमिनीत योग्य ओलावा असताना रोपांची लागवड करावी. 👉🏻या प्रक्रियेमुळे जमिनीतील उष्णता कमी होते, ज्यामुळे रोपांचे मर रोखता येते आणि वाढ चांगली होते. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख