AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मदर डेअरी स्टोअरमध्ये टोमॅटो 'या' रुपयात मिळतील.
कृषी वार्ताAgrostar
मदर डेअरी स्टोअरमध्ये टोमॅटो 'या' रुपयात मिळतील.
टोमॅटोचे भाव पुढील आठवड्यात नियंत्रणाखाली येण्याची शक्यता. ग्राहक व्यवहार व अन्न वितरण विभागात आयोजित आंतरमंत्रिम बैठकीत कर्नाटक आणि मध्य प्रदेशात नवीन टोमॅटो पिकाची आवक सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. आता ही टोमॅटो मदर डेअरी आपल्या स्टोअरमध्ये ५५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री करेल. पूर आणि पावसाने देशाच्या अनेक भागात पिकांचे नुकसान केले आहे, परंतु आंध्र प्रदेशात झालेल्या पावसाने टोमॅटोच्या पिकाचे नुकसान झाले नसल्याने तेथील सरकारला दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोचा पुरवठा वाढविण्यास सांगितले जाईल. सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटो ६० ते ८० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, मंत्रालयाच्या सांगण्यानुसार कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून टोमॅटो दिल्लीत येण्यास सुरुवात होताच पुरवठा आणि किंमती देखील सामान्य होतील. संदर्भ :- Agrostar १९ ऑक्टोबर २०१९
99
0
इतर लेख