AgroStar
मका पिकातील खोड किडीचे जीवनचक्र
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील खोड किडीचे जीवनचक्र
आपण मका हे पीक वर्षभर घेतो मात्र त्याच्यावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान होते. पतंगाच्या पंखाचा रंग फिक्कट तपकिरी असून, पंखाच्या कडेला तपकिरी रंगाचे चमकदार ठिपके असतात. पूर्ण वाढलेली अळी ही २ ते २१.५ सें.मी. लांब, धुरकट करड्या रंगाची असून डोके काळे असते._x000D_ जीवनक्रम : _x000D_ • अंडी अवस्था:- मादी पतंग पानांच्या खालील बाजूस दोन ते तीन रांगेत चपट्या आकाराची साधारण ३०० अंडी देते. अंडी ५० ते १०० च्या समूहांमध्ये असतात. हि अंडी मलईदार पांढरट रंगाची असतात._x000D_ • अळी अवस्था:- हि पिकास सर्वात हानीकारण अवस्था असून, याचा कालावधी १४ ते २८ दिवसांचा असतो. त्यामध्ये ती ५ ते ६ वेळा कात टाकते। त्यानंतर पूर्ण वाढलेली अळी खोडात छिद्र करून कोषावस्थेत जाते._x000D_ • कोषावस्था:- कोषातून साधारणतः एका आठवड्यानंतर प्रौढ बाहेर पडतो._x000D_ लक्षणे : _x000D_ • मका पिकाची उगवण झाल्यावर चौथ्या आठवड्यानंतर किडीचा प्रादुर्भाव होतो. _x000D_ • अळी सुरवातीस पानावर उपजीविका करते. नंतर पोंग्यातून आत शिरून आतील भागावर उपजीविका करते. त्यामुळे पोंगे मरतात._x000D_ • नंतर अळी खोडात शिरून खोड पोखरते. पोंग्यामधील पाने उमलल्यानंतर त्यावर एका सरळ रेषेत बारीक गोल छिद्र दिसतात._x000D_ नियंत्रण:- _x000D_ • पोंगेमर दिसताच मक्याची झाडे काढून नष्ट करावीत._x000D_ • शेतातील काडीकचरा, धसकटे वेचून संपूर्ण नष्ट करावीत। कारण त्यामध्येच ही अळी सुप्तावस्थेत राहते._x000D_ • मका पिकात चवळी, सोयाबीनची आंतरपीक म्हणून लागवड केल्याने खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. (४ ओळी मका : १ ओळ चवळी/सोयाबीन)_x000D_ • प्रादुर्भाव अधिक असल्यास डायमेथोएट ३०% ईसी @ २६४ मिली किंवा थायमेथॉक्झाम १२.६०% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन ९.५०% झेडसी @ ५० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स _x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_
113
5
इतर लेख